⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मळगाव येथील मराठा समाज बांधवांच्यावतीने मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, मराठ्यांचे योद्धा जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा बांधवांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आपला आनंदोत्सव व्यक्त केला. या आनंदोत्सवत मळगाव येथील मराठा बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.
