शिवाजी खांडेकर:शिक्षकेतर संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील..
⚡सावंतवाडी ता.०६-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दीड वर्षात शिक्षकेतर संघटनेचे एकही प्रश्न सोडवलेले नाहीत त्यामुळे हे अधिवेशन आम्ही सावंतवाडीत ठेवून आमचे प्रश्न त्यांच्याकडून मार्गे लागतील अशी अपेक्षा आहे, याबाबतची माहिती आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी दिली.
दरम्यान शिक्षकेतर संघटनेचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवता येण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यामुळे शाळा वाचवण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील असतात असेही खांडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.
यावेळी गजानन नांचे अनिल राणे, सुहास देसाई वैभव केंकरे आधी उपस्थित होते
याबाबत खांडेकर पुढे बोलताना म्हणाले की केसरकर हे प्रश्नांबाबत हे सकारात्मक असतात त्यांच्याबरोबर आठ वेळा बैठकाही झाल्या त्यांची भूमिका सकारात्मक दिसली परंतु ती प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे असेही श्री खांडेकर यावेळी बोलताना म्हणाले.दरम्यान उद्या सावंतवाडीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षितेकर संघटनेचे 7000 लोक येणार असून यावेळी विविध प्रश्न मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार असून नक्कीच त्यातील अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास देखील श्री खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला
