सिंधुदुर्ग महाराष्ट्रात हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर:जिल्ह्याला १०० कोटी दिल्याचेही केले जाहीर

⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हुशार जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचे श्रेय सर्व इकडच्या शिक्षकांना जाते, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

दरम्यान या जिल्ह्याला न्याय दिला. राज्यात सर्व जिल्ह्यांना पैसे दिले. मात्र सिंधुदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच शंभर कोटीची तरतूद करण्यात आल्याची देखील श्री केसरकर यावेळी सांगितले.

श्री.मंत्री केसरकर आज सावंतवाडीत आरपीडी हायस्कूल येथे बाल, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

You cannot copy content of this page