Headlines

करियर च्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार करावा…

उपवनसंरक्षक रेड्डी:आंबोली सैनिक स्कूल सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात..

आंबोली, ता.२२: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली च्या २० व्या वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले.

आंबोली सैनिक स्कूल च्या २० व्या उदघाटन कार्यक्रमासाठी सावंतवाडी उप वनसंरक्षक नवकीशोर रेड्डी,चेअरमन बाबुराव कविटकर, सैनिक पतसंस्था उप महाव्यवस्थापक प्रल्हाद तावडे,विजय नार्वेकर,सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दत्ता देसाई,शशीकांत गावडे, श्रीकांत गावडे,माजी प्राचार्य सुरेश गावडे,सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे,विजय राऊत,युवराज चव्हाण,तेजस्विनी पाताडे,चैताली सावंत,गंधाली मुंडले,श्री.चेंदवनकर,संस्थेचे प्राचार्य एन.डी. गावडे, सचिव सुनील राऊळ,संचालक शिवाजी परब, श्री वळंजू,जॉय डॉन्टस,दीपक राऊळ,वनक्षेत्रपाल विद्या घोडके,ग्रंथपाल राजन गावडे,अरुण गावडे,दिनेश गावडे,सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक श्री.रेड्डी म्हणाले,”मूल्यवर्धित शिक्षणाची आवश्यकता सर्वात जास्त आहे.इंटरनेट जगतापेक्षा सोशल मीडिया या सर्वात मूल्य,शिस्त आणि आवड वेगळेपण जपणे करियर आणि पुढच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. करियर कसे घडवायचे 11 वि 12 च्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने 3 वर्षानंतर कुठे जायचे आहे, कोणत्या क्षेत्रात जायचे आहे याबाबत आतापासून विचार करायला हवा.पुढच्या संधी काय आहेत.वेगळ्या वाटा दिसत असतील तर त्याची माहिती घ्यावी.विद्यार्थ्यांचे गट करून स्पर्धात्मक तयारी करावी,त्यांना युनिक उदाहरण म्हणून विविध पदावरील यशस्वी व्यक्तींना आणून मार्गदर्शन केल्यास त्यांच्याकडून आयडिया मिळतात”. जॉय डॉन्टस यांनी ही प्रास्ताविक केले.यावेळी संस्था सचिव सुनील राऊळ म्हणाले,”पीटर डॉन्टस यांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. नवीन जागेच्या ठिकाणी सैनिक स्कूल उभारण्यात येणार आहे.पुण्याच्या एक एजन्सी मार्फत दर महिन्याला विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण,स्पर्धात्मक शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.”यावेळी विविध गुण प्राप्त आणि स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावर्षीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार उप प्राचार्य ऋषिकेश गावडे याना देण्यात आला.मनोज देसाई स्पोर्ट टीचर,मायापा शिंदे बेस्ट टीचर,शिवराज पवार शिक्षण निरीक्षक,सतीश आईर बेस्ट स्पोर्ट टीचर,रुपेश आईर अधीक्षक,शरद जाधव नॉन टिचिंग,अनिकेत पाटील स्पोर्ट टीचर,बाबुराव झाडे उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.सूत्रसंचालन हंबीरराव अडकुरकर आभार प्रदर्शन ऋषिकेश गावडे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

You cannot copy content of this page