मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत स का पाटील शिवाजी संघाची सानिका मेस्त्री ठरली मालिकावीर…

मालवण दि प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा झोन क्रमांक चार मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. स. का. पाटील संघातर्फे प्रथम फलंदाजी करताना सानिका मेस्त्री हिने ३८ चेंडूत सहा चौकारांसह वैयक्तिक ४८ धावा करीत मालिकाविराचा किताब पटकावीला.

या स्पर्धेमध्ये स. का. पाटील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत सात बाद १६८ धावा जमविल्या यामध्ये गारगी व सानिका मेस्त्री यांनी चांगली सुरुवात करून दिली. तर इतर फलंदाजांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन दाखविले. तर जे. एस. एम. कॉलेजच्या वतीने सिद्धी पाटील हिने चार शटकांमध्ये तीन गडी बाद करीत गोलंदाजीची धुरा सांभाळली. तर दुसऱ्या डावामध्ये जे. एस. एम. कॉलेजचे फलंदाज स्वस्तात बाद होत ७१ धावांमध्ये सर्वबाद झाले. यावेळी स. का. पाटील संघाच्या वतीने गारगी जुवेकर हिने ३ गडी बाद केले तर सानिका मेस्त्री व श्रेया अटक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक क्षेत्ररक्षण गारगी जुवेकर हिच्याजवळून पाहायला मिळाले.

कोकण क्रीडा समिती सचिव श्री. चंद्रकांत नाईकयांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगुले, प्रा. के. के. राबते, प्रा. आर. एन. काटकर, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. शंकर खोबरे, प्रा. उज्वला सामंत, प्रा. हसन खान, संघाचे प्रशिक्षक संदिप पेडणेकर, ज्ञानेश केळूसकर, माजी विद्यार्थी प्रतिनिधी व पत्रकार ओंकार यादव, विद्यार्थी शुभम सकपाळ तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. विजेत्या संघाचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांनी अभिनंदन केले.

या स्पर्धेचे समालोचन प्रा बी. एच. चौगुले यांनी केले तर पंच बंटी केरकर, उमेश मांजरेकर, दीपक धुरी यांनी काम केले. गुणलेखन ज्ञानेश्वर केळूसकर,कुणाल केळुसकर, सिद्धी जुवेकर, सुशील शेडगे यांनी केले.

You cannot copy content of this page