शिवाजी वाचन मंदिरात 31 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

शतकोत्तर प्रथम वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले नियोजन

मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर संस्थेच्या शतकोत्तर प्रथम वर्धापन दिनानिमित्त ३१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वाचनालयाची नवीन इमारत येथे बाल आनंद मेळाव्यांतर्गत सकाळी १० ते ११.३० वा. विविध विषयांवर लघुपट, दत्त मंदिर पटांगण येथे सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत वक्ते डॉ. महेश- अभ्यंकर यांचे ‘स्वास्थ्य नवा दृष्टिकोन’ हे व्याख्यान आयोजित केले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page