कलमठ येथील शाळेच्या मुलांना मास्कचे वाटप
*💫कणकवली दि.१५-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळा व कलमठ कुभांरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी कलमठ उपसरपंच वैदेहि गुडेकर, कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग ,कलमठ ग्रा.पं.सदस्य राजु राठोड, माजी सरपंच निसार शेख,ग्रा पं सदस्या धनश्री मेस्त्री, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडिगावकर, व विलास गुडेकर, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
