Headlines

आता तरी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे आम. वैभव नाईक यांनी बंद करावी…

शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांचा आ. वैभव नाईक यांना टोला..

⚡कणकवली ता.१३-: आम. वैभव नाईक यांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या जबाबदारीचे व नियोजनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये. हिम्मत असल्यास स्वखर्चाने जनतेसाठी आरोग्य शिबिरे राबवावीत, परंतु असे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे व प्रसिद्धी मिळविणे हे आम. वैभव नाईक यांनी बंद करावे.सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे. याठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. ते आरोप शिवसेनेचे ( शिंदेगट ) चे तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी फेटाळून लावले आहेत.

भूषण परुळेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, आम. वैभव नाईक यांनी शासकिय आरोग्य यंत्रणेबाबत केलेले आरोप हे पूर्णतः बिनबुडाचे आहेत. आम. वैभव नाईक यांच्या पक्षामार्फत म्हणजे उ.बा. ठा. मार्फत कणकवली विधानसभा मतदार संघात घेतलेल्या आरोग्य शिबिरांना सर्व आरोग्य यंत्रणा हि शासकिय होती. या आरोग्य शिबिरांची सर्व जबाबदारी हि शासकिय आरोग्य यंत्रणांनी घेतली होती, आणि आता याच आरोग्य यंत्रणेवर आम. वैभव नाईक यांनी टीका करणे आणि तेही विधानसभेमध्ये हे निश्चितच हास्यास्पद आहे.

विकासात्मक चर्चा करण्यासाठी आम. वैभव नाईक यांच्या जवळ कोणताही मुद्दा नसल्याने तसेच स्वतः च्या मतदार संघातील त्यांचे भवितव्य अधांतरी झाल्याने आम. वैभव नाईक यांची बडबड सुरु असल्याचे श्री. परुळेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page