माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती: सुधारित अहवाल तयार करा; कृषी व विमा प्रतिनिधींना सूचना..
सावंतवाडी ता.१२-: शिरशिंगे पंचक्रोशीतील काजु विमाधारक शेतकर्यांना सन २०२२-२३ मधील पीकविमा योजनेचा परतावा मिळण्यासाठी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे लक्ष वेधले. कृषी विभाग व विमा प्रतिनिधींनी तात्काळ याबाबत सुधारीत अहवाल कृषी आयुक्तांना करा अशा सुचना यावेळी श्री पानवेकल यांनी दिल्या.
यावेळी कृषी विभाग व विमा कंपनीने जाणून बुजून सावंतवाडी मंडलाशी जोडून आम्हाला विमालाभापासून दुर ठेवले असा आरोप करत यापुढे एकतर माडखोल मंडलात स्वतंत्र स्वयंचलित हवामान केंद्र बसवा अन्यथा आम्हाला आंबोली मंडलाशी जोडा अशी मागणी केली.
यावेळी राजन राऊळ, सुरेश आडेलकर विजय बंड प्रकाश नाईक सुमंत राऊळ,सुबोध राऊळ आदी शेतकरी उपस्थित होते
