विविध गावांत फिरून चित्र रथाद्वारे देणार माहिती.
⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी गावांत योजनांची माहिती देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील निगुडे आणि मडुरा, देवगड तालुक्यातील शिरगांव आणि हडपीड, कणकवली तालुक्यातील साकेडी आणि करंजे तर कुडाळ तालुक्यातील गोठोस आणि नारुर या गावांत फिरून योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
