कुडाळ गिअर अप जीमची रांगणागड मोहीम यशस्वी
⚡कुडाळ ता.१०-: गिअर अप जीमच्या वतीने कुडाळ आणि परिसरातील दुर्गप्रेमी आज रांगणागड सर करण्याची यशस्वी मोहीम पार पडली.गिअर अप जीमचे हे “चोथे वर्ष” दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिला/ वास्तुला नमन करण्यात आले.
सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सुरु झाला प्रवास,त्यासाठी गाड्यांचे नियोजन जोडणी करणे, इथपासून या मोहिमेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अल्पोपहार, मोहीमेचा शुभारंभ, शिव छत्रपतींना वंदन, करण्यात आले कु.शौर्य शिंदे याचा देखील वाढदिवस सुरवातीला साजरा करण्यात आला मग गडाच्या पायथ्याशी थोडासा सराव, पाणी-टोपी वाटप, ट्रेकींगच्या सुचना असे सारेच नियोजन जीम च्या वतीने करण्यात आले होते.प्रत्येक सहभागी व्यक्ती व्यवस्थित गडावर पोहचण्यासाठी गिअर अपची टीम सातत्याने लक्ष ठेवून होती. आवश्यक त्यावेळी मदत पुरवित होती. गडावर पोहचल्यानंतर गडावरील वास्तुंबाबत, गडाच्या इतिहासाबद्दल शास्त्रीय माहिती आपल्या ओघवत्या शैलीत देण्यासाठी अभ्यासु असे गाईड उपलब्ध होते. गडावर बरीच भ्रमंती करुन उतरल्यानंतर स्वादिष्ठ जेवणाचा आस्वाद घेता आला. भारावल्या वातावरणात आजचे ट्रेकींग खूप छान पध्दतीने पार पडले. या मोहिमेत नव तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पूर्ण ट्रेकींगच्या दरम्यान खूपच आदर्शवत वर्तन ठेवले.
गिअर अपचे संचालक साईराज जाधव यांनी अत्यंत जबाबदारीने नियोजन केले. त्यांच्यासमवेत त्यांना कायम साथ देणारे गड प्रेमी पंकजसर यांचेही काम वाखाणण्यासारखेच होते. आजच्या मोहिमेत कणकवली, सावंतवाडी, ओरोस, झाराप येथून ट्रेकर सहभागी झाले होते. यात डॉक्टर, कुडाळ येथील काही उद्योजक व नौदलाच्या अधिका-यांचाही समावेश होता. पंकज गावडे आणि प्रथमेश चुडनाईक यांनी नियोजनात सिंहाचा वाटा उचलला.व सर्व सहभागी प्रमाणपत्र देखील देण्यात आले.
ह्या ट्रेकिंग दरम्यान सुरवातीला पर्वत दिन साजरा करण्यात आला दि. ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी विभागातर्फे या दिवसाचे आयोजन करण्यात येते. पर्वतांचे अनन्य साधारण महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू आहे. त्या अनुषंगाने दरवर्षी पर्वता संदर्भात एक संकल्पना देण्यात येते. या वर्षीच्या पर्वतदिनाची संकल्पना " पर्वतांवरील परिसंस्थेचे पुनरुज्जीवन" ह्या संदर्भात श्रीमती दिप्ती श्रीराम मोरे,
सह सचिव सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना.यांनी दिली.
प्रास्ताविक विशाल कदम यांनी केले. विनायक पिंगुळकर तसेच शौर्य शिंदे यांनी सुरवातील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.तसेच अमित सरनोबत गडा खालील नियोजन किशोर सरनोबत गाईड म्हणून लाभले तसेच विशाल कदम ह्या सर्वांचे सत्कार गिअर अप जीम च्या वतीने करण्यात आले.संकल्प दळवे यांनी फोटोग्राफी काम पाहीले.
