⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथील माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजी मार्केट यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या राजापुर येथील निवासस्थानी भेट दिली.
राष्ट्रीय काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष
विकासभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाचे सदस्य यांनी विविध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समस्यांवर चर्चा करत पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीसाठी आमंत्रित केले.
यावेळी याप्रसंगी मित्रमंडळाच्या वतीने माजी आम. खलीफे यांचा भगवान कासले, महेश आंबेरकर यांच्या उपस्थितीत पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी या नात्याने गुरुचा आदरपूर्वक सन्मान केला.
यावेळी बोलताना खलिफे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही समस्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयाल औषधोपचारासाठी ७ लाख रुपयाची सढळ हस्ते मदत केली, परंतु ती सर्व सामान्यपर्यंत पोहचली की नाही. हे देखील समजणे कठीण आहे.असे त्या म्हणाल्या.
यावेळी संजय मालंडकर, सुनील काणेकर, भाई काणेकर ,महेश काणेकर, संगीता वाळके, सविता डेगवेकर, रेखा साळगांवकर, अविनाश गावडे, प्रसाद उगवेकर, प्रसाद पाताडे,प्रसाद घाडीगांवकर, सईद नाईक, जमील कुरेशी, आनंद बाणे आदी उपस्थित होते.
