⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा दि. १ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी ८ वा. श्री ब्राह्मण देवाचे विधिवत पूजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन व रात्री ९ वा. श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरणचे बुवा समीर कदम (पखवाज- ओंकार दुखंडे, तबला- भावेश लाड) विरुद्ध श्री महादेश्वर प्रासादिक भजन नाडन देवगडचे बुवा संदीप पुजारे (पखवाज- मंजिल काळसेकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. तसेच श्री ब्राह्मण देवाचा हरिनाम सप्ताह २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. ३ रोजी दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. दुपारी १.३० वाजता ब्राह्मण भोजन कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कातवड ग्रामस्थांनी केले आहे.