नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांना स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स

⚡कणकवली ता.०७-: नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांना स्टार एज्युकेशनच्या वतीने यंदाच्या 2023 चा स्टार एज्युकेशन अवॉर्ड हा प्राप्त झाला आहे.
एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हि संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यासोबत सलंग्न आहे.
हा पुरस्कार सोहळा बी.के.सी- एम.एम.आर.डी.ए मैदान मुंबई येथे पार पडला
हा अवॉर्ड प्राप्त झाल्याने नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल गेली 15 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले काम करत असल्याचे आणखी एकदा सिद्ध झाले आहे. शाळेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page