नगरसेवक उदय मांजरेकर यांनी दिव्यांगाना व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला निधी

कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आपल्या प्रभाग क्र.१५ मध्ये नगरपंचायतीमार्फत नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांना योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले.

यामध्ये दिव्यांग बांधव तनुजा कुंभार, शामसुंदर माजगावकर, तुकाराम मांजरेकर, ओंकार कुंभार, सायली कुंभार, गीतराज जाधव, सीमा चव्हाण
या सर्वांना व्यवसायाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले, कोटेशन आदी कागदपत्रे नगरसेवक मांजरेकर यांनी उपलब्ध करून देत लाभ मिळवून दिला. नगसेवक उदय मांजरेकरांच्या कार्याचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page