प्रथमेश तेली यांच्या मागणीला यश;२० डिसेंबर रोजी शिबिर…
⚡सावंतवाडी ता.०६-: वाहन नोंदणीकरण व नवीन वाहन परवाना काढण्याचे शिबीर सावंतवाडी शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा चालू करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशान्वये या शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येत आहे. भाजप मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी उपप्रादेशिक वाहन अधिकारी यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती, शिबीर पुन्हा सुरु झाल्याने त्या मागणीला अखेर यश आले आहे.
तसे पत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तेली यांना प्राप्त झाले आहे. २० डिसेंबर रोजी सावंतवाडी येथील शिबीर दौरा नियोजित असून सदर शिबीर कार्यालयाकरिता सावंतवाडी येथील विश्रामगृह उपलब्ध करून द्यावे अशी विनंती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केली आहे.
