*मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी महसूल व पोलिस प्रशासनावर व्यक्त केला संशय
*💫सावंतवाडी दि.१३-:* तहसील कार्यालयासमोर उभा असलेला डंपर गायब होण्यामागे नक्कीच महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाचा हात आहे असा खळबळजनक आरोप मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे. त्या ठिकाणावरून डंपर कोणी चोरून नेला याचा शोध सीसीटिव्ही च्या माध्यमातून शोधून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून, अन्यथा मनसेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा देखील त्यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने कारवाई केली होती. यातील एक डंपर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेला आहे. रात्र पाळीचे कर्मचारी असताना डंपर कसा काय चोरी होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करत त्यानी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन बाबत संशय व्यक्त केला आहे.
