ओबीसी समाजाने कुणालाही बळी पडू नये…

वामन मेश्राम:सावंतवाडीत राज्यस्तरीय महाप्रबोधन शिबिर संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२७-: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .ओबीसी समाज महाराष्ट्रात संघटित नसल्यामुळे ओबीसी समाजाला बळी पडले जात आहे .ओबीसी समाजाने कुणालाही बळी पडता कामा नये असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाप्रबोधन शिबिरात केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय समन्वयक अर्चना घारे परब बहुजन मुक्ती मोर्चा च्या माया जमदाडे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट संदीप निंबाळकर डॉक्टर संजीव लिंगवत प्राध्यापक सचिन पाटकर शफिक खान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कुणबी हेच मराठा आहेत ओबीसी मध्ये कुणबी शिवाय अन्य कुठलीही जात मराठा म्हणून आढळत नाही  केवळ कुणबी मराठा आढळतात अशा अनेक जातीने आपण उच्च दाखवण्यासाठी अपग्रेडेशन केले. सर्व मराठा कुणबी आहेत आता  आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे 2024 च्या लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपकडून हे काम केले जात आहे.

You cannot copy content of this page