कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा

कणकवली नगरपंचायत ओडीएफ प्लस प्लस घोषित;हे यश समस्त कणकवलीवासीयांचे – समीर नलावडे

*💫कणकवली दि.१३-:* स्वच्छ सर्वेक्षण 2020-2021 अंतर्गत केंद्रीय पथकाने नुकतीच कणकवली शहराच्या स्वच्छतेची पाहणी केली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायत ला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायतला मागील 2 वर्षे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ओडीएफ प्लस दर्जा मिळाला होता. मात्र यावर्षीच्या सर्वेक्षणात कणकवली नगरपंचायत जे मुसंडी मारली असून ओडीएफ प्लस प्लस दर्जा मिळवला आहे. हा दर्जा मिळाल्यामुळे कणकवली नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण च्या देशातील स्पर्धेत पुढे आली आहे. हे यश कणकवली वासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे मिळाले असून यात यापुढेही शहरवासीयांच्या साथीने सातत्य राखणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page