मुहुर्तमणी चारी प्रकरणी संशायीताचे रेखाचित्र प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-12 सावंतवाडी तालुक्यातील मळगांव रोड वरील माजगाव येथे मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या फिर्यादी कांचन शिरसाठ यांच्या गळ्यातील मुहुर्तमणी अज्ञात चोरट्याने हिसकावून, पलायन केले होते. या प्रकरणी तापासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयीताचे रेखाचित्र तयार केले आहे. सदर रेखाचित्रातील इसमाबाबत माहिती मिळाल्यास दुरध्वनी क्रमांक 02362,228209 अगर गुन्हा अन्वेषण अधिकारी एस.एम. शेळके, मोबाईल क्र.8888828778 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एस.एम.शेळके पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी केले आहे. सोबत : रेखाचित्र

You cannot copy content of this page