निरवडे येथील निमंत्रित भजन स्पर्धेत कणकवली येथील लिंगेश्वर भजन मंडळ प्रथम…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ- : निरवडे-झरबाजार येथील श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाने आयोजित केलेल्या निमंत्रित भजन स्पर्धेत कणकवलीच्या लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.

निरवडे येथील साटम महाराज मंदिरात गुरुद्वादशीनिमित्त कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत दहा भजन संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत द्वितीय क्रमांक फोंडाघाटच्या पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने तर तृतीय क्रमांक माणगाव येथील नवतरुण प्रासादिक भजन मंडळाने पटकाविला. उत्तेजनार्थ प्रथम पिंगुळी येथील महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने, द्वितीय क्रमांक वैभववाडीच्या दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाळाने प्राप्त केला. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : उकृष्ट गायक – योगेश मेस्री ( लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली), उकृष्ट हार्मोनियम – हेमंत तेली ( पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट), उकृष्ट पखवाज – प्रथमेश राणे (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी), उकृष्ट तबला – सिद्धेश वेंगुर्लेकर (विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,मातोंड), उकृष्ट झांज – चिन्मय लाड (दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी), उकृष्ट कोरस – (लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कणकवली) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ५००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व ३००१ रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून रामराव नायक, विश्वास जाधव, विनायक जाधव (मुंबई) यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजा सामंत ( नेरुर ) यांनी केले.

You cannot copy content of this page