टायर फुटून झालेल्या अपघातात पुण येथील तीन पर्यटक जखमी…

अकेरी येथील घटना: अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले..

सावंतवाडी ता.१३-: अकेरी येथे चार चाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुण येथील तीन पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडले.

दरम्यान त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले,परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अनुश्री गुंजे (वय 35) सीमा फाटक वय (38) राहुल गुंजे (38) अशी तिघांची नावे आहे.

You cannot copy content of this page