दयानंद मांगले यांना राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार प्रधान…

उस्मानाबाद येथील नवरत्न न्यूज रिपोर्टर परिवाराकडून गौरव

देवगड
उस्मानाबाद येथील नवरत्न न्यूज रिपोर्टर परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा पत्रकार रत्न २०२३-२४ चा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील पत्रकार दयानंद यशवंत मांगले याना प्राप्त झाला आहे या पुरस्कार वितरण सोहळा आलूर ता.उमरगा येथे पार पडला.या सोहळ्यास कौटुंबिक अडचणीमुळे या उपस्थित न राहिल्याने हा पुरस्कार नुकताच दयानंद मांगले याना रवाना करण्यात आला.शाल सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या पुरस्काराबद्दल संपादिका सौ जयश्री शरद पवार व कार्यकारी संपादक शरद खुबा पवार यानी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र क्रिकेट १६/१९/२३वर्षाखालील संघात निवड झालेला कोल्हापूर येथील क्रिकेटपटू साहिल शिबे व त्यांचे बंधू इंजिनिअर सागर शिबे यांच्या उपस्थितीत दयानंद मांगले याना धनत्रयोदशी दिवशी प्रदान करण्यात आला.

You cannot copy content of this page