महाराष्ट्राची लोकधारेच्या यशस्वीतेनंतर वेरली प्रशालेने विविध कार्यक्रमांचे केले आयोजन

⚡मालवण ता.११-: वेरली बांधावरची शाळा, परसबाग, मुलींचा दशावतारी नाट्यप्रयोग, तसेच गतवर्षीच्या महाराष्ट्राची लोकधारेच्या यशस्वीतेनंतर यावर्षी वेरली प्रशालेने कार्यक्रम २०२३ च्या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

२५ मुलांचा सहभाग असलेला कृष्णलीला आणि शिक्षक, पालक, व्य.स. अध्यक्ष उपाध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ व सदस्य, माजी सरपंच ग्रामस्थ यांनी सादर केलेला सर्वधर्मीय सणोत्सव सर्वांनाच भावला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची कोरिओग्राफी सागर रेडकर याने केली. मुख्याध्यापिका शुभदा रेडकर, पदवीधर शिक्षक राजेंद्र धारपवार, शिक्षक उमेश खराबी, विमल खराबी, उदय कदम या शिक्षकांसोबतच महिलावर्ग, पालकवर्ग, ग्रामस्थ, माजी सरपंच, आजी-माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला व्य.स अध्यक्ष नारायण पोयरेकर, उपाध्यक्षा सिल्व्हिया लोबो, मेस्त्री कुटुंबीय, गणेश रेडकर, सागर रेडकर, सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब, पोलिस पाटील प्रमोद परब, माजी सरपंच आनंदी परब, पालक, ग्रामस्थ व आजी-माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page