जीवन रक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांची पोलिसांकडे मागणी..
सावंतवाडी ता.११-:
येथील शहरात मोती तलाव येते दिवाळी सणानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक या परिसरात येत असतात तरी पोलिसांनी गस्त वाढून धूम स्टाईल रोखावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.
दरम्यान या आदी देखील दिवाळी सण कार्यक्रमावेळी मोती तलावात अनेक अपघात घडले आहेत. तरी अशा घटना पुन्हा होवू नये याची पोलिसांनी आधीच दखल घेऊन दिवाळीसाठी चार दिवस मोती तलाव परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी देखील श्री मसूरकर यांनी यावेळी केली आहे.
