इच्छुक अपप्रचार करून आपला मार्ग मोकळा करू पाहत आहेत
मंत्री केसरकर यांचा राजन तेली यांना नाव न घेता टोला
⚡सावंतवाडी ता.११-: मी खासदारकी लढवणार असे काही लोक अपप्रचार करीत आहेत. यातून आपला मार्ग मोकळा होईल असे काहीना वाटत आहे. परंतु मी खासदारकी लढवण्यासाठी इच्छुक नसून मी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी दुसरा मार्ग पकडण्याचा देखील प्रयत्न करावेत असा टोला देखील त्यांनी राजन तेली यांच नाव न घेता लगावला.
