…तर मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो…

लक्ष्मीकांत पार्सेकर: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

⚡सावंतवाडी ता०५.-: मी सिंधुदुर्गचा जावई आहे तुम्ही माझा बरेच वेळा भाषणात माजी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला परंतु, मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो असे सुतोवाच गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे केले.

दरम्यान ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी केले.श्री. पार्सेकर आज सिंधुदुर्ग सावंतवाडी येथे ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमानिमित्त आले होते यावेळी त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

You cannot copy content of this page