क्रिकेट असोसिएशन कडून लेदरबॉल निवड चाचणी 4 व 5 नोव्हेंबर ला आयोजन…

सावंतवाडी : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन च्या वतीने आयोजित निमंत्रित साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी १६ वर्ष व १९ वर्ष खालील मुलांचा क्रिकेट संघ निवड चाचणी शनिवार ४ नोव्हेंबर रोजी व रविवार म ५ नोव्हेंबर ला वेगुर्ले येथील कॅम्प मैदानावर घेण्यात येणार आहे.यासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत खेळाडूंनी पोचावे असे आवाहन सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.
या मध्ये १ सप्टेंबर २००७ नंतर जन्मलेल्या खेळाडूला १६ वर्ष मध्ये व १ सप्टेंबर २००४ नंतर जन्मलेल्या खेळाडूला १९ वर्ष मध्ये भाग घेता येईल. खेळाडूंनी पूर्ण गणवेशात जन्म दाखला, आधार कार्ड व प्रवेश फी रु. २०० घेऊन येणे गरजेचे आहे.
ही निवड चाचणी सोबत वेंगुर्ला कॅम्प या मैदानावर उपस्थित रहावे. अधिक माहीतीसाठी नंदकिशोर रेडकर ९४०३५५९८८४ व रघु धारणकर यांच्याशी सर्पक साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page