पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणार…

विशाल परब: येणाऱ्या काळात राज्याभर करणार दौरा

सावंतवाडी ता.२३-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम मी व माझे सहकारी या पदाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश भाजप उपाध्यक्ष विशाल परब यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तो नक्कीच मी या पदाच्या माध्यमातून सार्थकी लावेल असेही श्री परब यांनी यावेळी सांगितले. विशाल परब भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विशाल परब पुढे बोलताना म्हणाले की आज जिल्ह्यातील तरुण अनैतिक व्यवसायाकडे वळत आहेत .त्यामुळे मी व माझे नेते येणाऱ्या काळात जिल्ह्यात एक नवी रोजगाराची संधी उपलब्ध करू. जेणेकरून त्या तरुणांना रोजगार मिळवून अवैध व्यवसायाकडे गेलेल्या तरुणांना नक्कीच मी वळवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसचे येणाऱ्या काळात राज्यभर दौरा करून ठिकठिकाणी असलेले जनतेचे प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या पदाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करेन असे ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी त्यांनी देशासह राज्यातील नेत्यांचे देखील आभार मानले.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर जितू गावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page