मालवणात २१ व २२ रोजी टेबल टेनिस प्रशिक्षण…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण रेवतळे येथील विष्णू कोरगांवकर यांच्या मालवण टेबल टेनिस अकॅडमी मध्ये शनिवार दि.२१आक्टोबर रोजी सायंकाळी ३ ते ६ आणि रविवार दि.२२ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत टेबल टेनिस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात माजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीम.इंदू एन. आर. या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत. श्रीम. इंदू एन. आर. या ज्युनिअर असल्यापासून नॅशनल चॅम्पियन होत्या तसेच सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मिळविली होती शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशिप, दोन काॅमनवेल्थ गेम्स, तीन एशियन चॅम्पियनशिप, लेबेनाॅन ओपन, कतार ओपन, ब्राझील ओपन, यू .एस्.ओपन, एशिया कप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव हेमंत वालकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page