⚡सावंतवाडी ता.१७-: दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकाला सावंतवाडी न्यायालयाने २५ हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाक्यावर करण्यात आली होती.ज्योतिबा परशुराम गावडे (वय ३०, रा. शिवाजीनगर-बेळगाव) असे त्याचे नाव आहे.याकामी अॅड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.
बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकाला सशर्त जामीन…
