विशाल परब यांच्याहस्ते मडूरा येथील दांडिया कार्यक्रमाचा शुभारंभ…

विशाल फाऊंडेशनने केले आहे आयोजन:माऊली मंदिरात प्रेक्षकांची गर्दी..

⚡बांदा ता.१६-: मडुरा येथे माऊली मंदिरात विविध कार्यक्रम नवरात्र उत्सव निमित्त आयोजित करण्यात आले असून आज विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत गोवा व सिंधुदुर्गातील नामांकित ग्रुपचा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान यात भूमिका आराध्या दांडिया ग्रुप कोरगाव, श्री देव रवळनाथ दांडिया ग्रुप तळर्णा व श्री थळकर दांडिया ग्रुप तळवडे यांचा समावेश आहे. तसेच पावशी कुडाळ येथील सखी फुगडी संघाचा सदाबहार फुगडीचा कार्यक्रम होणार असून यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी मडुरा परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page