⚡कुडाळ ता.१६-:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने, पाणी व स्वच्छता कमिटीच्या हस्ते आज प्रत्येक घरात डस्टबीन (कचराकुंडी) वाटप व आरोग्य उपकेंद्राजवळ स्वच्छतागृह बांधणे या दोन्ही कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवली. यावेळी वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे आणि अन्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थितीत होते.
यावेळी वेताळ बांबर्डे गावातील ग्रामस्थांना स्वच्छ भारत मिशनचे महत्व सांगण्यात आले.
वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने कचराकुंडी वाटप
