*💫देवगड दि.०९-:* देवगड-जामसंडे नगरपंचातीला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त झाल्यामुळे देवगड-जामसंडे शहराच्या विकासामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छतेबाबत हा दर्जा दिला जातो.सलग तिन वर्षे हा दर्जा देवगड-जामसंडे नगरपंचायतीला मिळाला आहे. देवगड-जामसंडे शहराची आता विकासात्मक दर्जाकडे वाटचाल सुरु असून यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी तसेच कर्मचारी व ग्रामस्थांचा देखील वाटा आहे. स्वच्छतेविषयक दरवर्षी केंद्र शासनाकडून मानांकन दिले जाते.गेली तिन वर्षे सातत्याने देवगड-जामसंडे नगरपंचायतीला ओडी़एफ प्लस हा दर्जा दिला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून देवगड-जामसंडे नगपंचायतीने अनेक उपक्रम राबविले असून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरुन करुन त्यांची खत निर्मिती देखील केली जाते. दिल्लीच्या केंद्र स्तरीय कमिटीने नुकतीच देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हददीतील स्वच्छता विषयक पाहणी करुन या कमिटीच्या परिक्षनानंतर ओडीएफ दर्जा देण्यात आला आहे. अशी माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत ला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त
