स्थानिक स्तरावर नियम बदल केल्याचा ठेवला ठपका: रखडलेले कामे मार्गी लागण्यासाठी ठेकेदाराने पुढे येण्याचे देखील केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०९-: सचिव स्तरावरून तोंडी आदेश घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामाचे नियम स्थानिक पातळीवर बदलून निविदा काढल्याने मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाच्या नियमात बदल करून निविदा प्रक्रिया राबवल्याने अनेकांनी कामाचे टेंडर भरलेच नाही त्याचा भुर्दंड शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघाला बसला त्यामुळे आज झालेल्या ठेकेदारांच्या बैठकीमध्ये उपस्थित आणि आपले गाऱ्हाणे मंत्री केसरकर यांच्यासमोर मांडले. अधिकाऱ्यांची चूक लक्षात येतात की सरकारांनी संबंधितांना चांगले झोपले तर मंत्रालय पातळीवर याबाबत बैठक घेऊन ठेकेदारांच्या समस्या सोडून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे रखडली आहेत येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता निविदा प्रक्रिया राबवताना संबंधित अधिकाऱ्याने स्थानिक पातळीवर नियमात बदल केला याचा आर्थिक परिणाम ठेकेदारांना सहन करावा लागणार होता एकूणच ही बाब लक्षात घेता येथील ठेकेदाराने निविदा प्रक्रिया भरण्याकडे दुर्लक्ष केला संबंधित कामे न झाल्याने आणि जनतेतून ओरड होत असल्याने मंत्री केसरकर यांनी आज संबंधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांचे संयुक्तिक बैठक घेतली यावेळी झालेल्या चर्चेत ठेकेदारांनी आपली कैफियत मंत्री केसरकर यांच्यासमोर मांडली सदरची कामे केल्यास आपल्याला कसा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार हेही त्यांनी समोर आणले मुळात या सर्वालाच अधिकाऱ्यांची चूक कारणीभूत असल्याचे उघड होताच केसरकर यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत खडसावले. तर जे काय ठेकेदारांचे प्रश्न आणि तांत्रिक अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आपण मंत्रालय पातळीवर संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ ते मार्गी लावू तसेच अन्य काही अडचणी असल्यास त्याही सोडवण्या साठी पुढाकार घेऊ परंतु रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी ठेकेदाराने पुढे यावे असे आवाहन केले
