राणे महाराज जयंतीनिमित्त वराड येथे विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०९-: प. पू. राणे महाराज यांचा ९५ वा जयंत्युत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १३ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा, सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. हरिपाठ व रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. – महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. शिवरामेश्वर भजन मंडळ, आचराचे भजन, रात्री ८ वा. सिद्धिविनायक भजन मंडळ, कुडाळचे भजन, ९ वा. विठ्ठल-रखुमाई दिंडी भजन मंडळ, आचरा देऊळवाडीचे भजन. १४ रोजी सकाळी ९ वा. हरिपाठ, १० वा. रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ९ वा. स्थानिक भजने, १५ रोजी ९५ वा जयंती उत्सव सोहळा- सकाळी ८ वा. मूर्ती अभिषेक व पादुका पूजन, १० वा. नामदेव महाराज भक्त मंडळींचे भजन, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद (अखंड सुरू), सायंकाळी ४ वा. पालखी सोहळा (कै. गुरुनाथ म्हाडगूत, कट्टा यांचे घर ते प. पू राणे महाराज मठ), ७ वा. आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ‘श्रीयाळ चांगुणा’ नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राणे महाराज ‘सेवा ट्रस्ट, कुसरवेवाडी, वराड (कट्टा) यांनी केले आहे

You cannot copy content of this page