बांदा/प्रतिनिधी
‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले येथील प्रभाकर शिरसाट यांचा त्यांच्या निवासस्थानी बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, नंदादीप केळुस्कर, दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सनी काणेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, सुधीर शिरसाट आदिसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री शिरसाट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री शिरसाट हे बांदा शहरातील जुने फार्मासिस्ट असून त्यांना मिळालेल्या पुरस्कारमुळे बांदावासियांना अभिमान असल्याचे श्वेता कोरगावकर यांनी यावेळी सांगितले.
