मिलाग्रिस हायस्कूलचा क्रिकेट स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०७-: नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अजिंक्य पद पटकावत जिल्हा स्तरावर आपले नामांकन पक्के केले आहे.

विजेत्या संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page