बांदा कट्टा कॉर्नर येथे गाडीचे नुकसान करणाऱ्यास संतप्त जमावाचा चोप…

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात कट्टा कॉर्नर येथे पार्क करून ठेवलेल्या मालवाहू गाडीवर कास येथील विद्याधर गवंडे यांनी दांडा मारून गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान केले. यावेळी संतप्त जमावाने त्याला चोप देत बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले. बांदा पोलिसांनी त्यास समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा कट्टा कॉर्नर येथे मालवाहू टेम्पोचा स्टँड आहे. तेथे नेहमीप्रमाणे सर्व टेम्पो धारकांनी आपल्या गाड्या पार्किंग करून ठेवल्या होत्या. दरम्यान कास येथील विद्याधर गवंडे यांनी त्यातील एका वाहनाच्या दर्शनी भागाच्या काचेवर दांडा मारून काच फोडली. दरम्यान तेथून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी त्याला अडवून बांधून घालून यथेच्छ चोप दिला व त्याला बांदा पोलिसांच्या स्वाधीन केला. बांदा पोलिसांनी त्याला समज देत नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

You cannot copy content of this page