कॅथॉलिक बँकेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी
कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयात प्रमुख पाहुणे रेव्ह. फा. मिलेट डिसोजा तसेच सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरूवातीला फा. मिलेट डिसोजा यांनी प्रार्थना केली व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्त साधून संविता आश्रम ता. कुडाळ येथे संस्थेमार्फत जिवनावश्यक वस्तूंचे वाटप व आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठवान सभासद, ग्राहकांचे, मा. अध्यक्ष श्री. पि.एफ डॉन्टस यांनी मनःपूर्वक आभार मानले
तसेच २९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ऑफर म्हणून दसरा व दिवाळी सणानिमित्त “कॅथॉलिक उत्सव ठेव योजना” मुदत १८ महिने व्याजदर ९.५० टक्के सुरू करत असून आपली गुंतवणूक करून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षांनी यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page