तुळशीदास रावराणे:विविध कार्य. सह. सोसायटी लोरे ग्रामपंचायत येथे बैठक संपन्न…
⚡कणकवली ता.०६-: दुध उत्पादनवाढी संदर्भात कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्य. सह. सोसायटी लोरे मार्फत लोरे ग्रामपंचायत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .
तुळशीदास रावराणे यांनी संस्थेचे दुध कलेक्शन १५० लिटर वरून ५०० लिटर प्रति दिवस कारण्याचा विश्वास व्यक्त केला
या बैठकीत गोकुळचे संकलन अधिकारी अनिल शिखरे यांचे मार्गदर्शन लाभले. दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध वाढीसाठी कोणत्या प्रकारचे खाद्य ,त्याचे नियोजन,गोकुळच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालय सहा.व्यवस्थापक मंदार चव्हाण यांनी दुधाळ जनावर यांच्या खरेदीसाठी बँकेकडुन मिळणारे कर्ज, तसेच त्या निगडीत शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली.
यावेळी माजी सभापती मनोज रावराणे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी सिंधुदुर्ग बँक फोंडा शाखेचे व्यवस्थापक श्री. गावकर, सरपंच लोरे सरपंच अजय रावराणे,
उपसरपंच सुमन गुरव, नरेश गुरव, सुनिल रावराणे, लोरे विविध कार्यकारी सह. सोसायटीचे संचालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व लोरे गावातील दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
