डोंबारी समाजाच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या…

डोंबारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष:जागा उपलब्ध करून देण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन..

सावंतवाडी,दि.०६ शहरातील डोंबारी समाज हा बऱ्याच वर्षापासून सावंतवाडीत स्थलांतरित आहे. परंतु सध्या स्थितीत या समाजातील काही व्यक्ती मृत पावल्यास ती दफन करण्यासाठी जागे संदर्भात मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्याचबरोबर त्या स्मशानभूमीमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्मशानभूमी जागा निश्चिती संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी लवकर तोडगा काढू व त्या स्मशानभूमी च्या जागेत विविध सोयी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी अखिल महाराष्ट्र डोंबरी समाज संघटनेचे अध्यक्ष मयूर लाखे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, कार्याध्यक्ष सुरेश सोनटक्के, उपाध्यक्ष भारत लाखे, सचिव नरेश खोरागडे, शिवाजी पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page