मळगाव येथे १ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

सुधीर राऊळ वाढदिवसानिमित्त आयोजन:लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, राऊळ यांचे आवाहन..

सावंतवाडी : सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजित आणि पुरस्कृत व लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे त्यासाठी हे शिबिर आयोजित केल आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी शिबिराला उपस्थित राहून आपले नेत्र तपासुन घ्यावे, असे आवाहन सुधीर राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page