शिवसेनेकडून गणेशभक्तांना साहित्य वाटप

⚡मालवण ता.२४-: गणेशोत्सवानिमित्त शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मालवण तालुक्यातील पोईप व मसदे – चुनवरे येथे गणेश भक्तांना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी चुनवरे गावठणवाडी, पोईप खालची पालववाडी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे मालवण – कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शाखा प्रमुख नारायण (पप्पू) राणे, स्वप्नील पोईपकर, बाबाजी नाईक तसेच स्थानिक व मुंबईस्थित पदाधिकारी उपस्थित होते.

पोईप व चुनवरे येथील प्रलंबित विकासकामे शिवसेनेतर्फे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, असे यावेळी बबन शिंदे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page