हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव साजरा..

⚡दोडामार्ग ता.२४-: येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवसीय गणेश उत्सव साजरा करण्यात आला. समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली. कोकणात घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते हीच संकल्पना घेऊन महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवसीय गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरत्या, भजने,फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर केले.
यावेळी हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. रोहन बागकर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page