पाडलोस माडाचेगाळव येथे स्ट्रीट लाईटचा खांब कोसळला…

मुसळधार पावसाचा फटका : ऐन चतुर्थीत पावसाचा जोर वाढला

⚡बांदा ता.२२-; ऐन चतुर्थीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका पाडलोस माडाचेगाळव येथील स्ट्रीटलाईटला बसला. आज शुक्रवारी सकाळी एक विद्युत खांब उन्मळून रस्त्यावर कोसळला. दरम्यान कोणतीही वाहतूक नसल्याने हानी टळली.

मडुरा पंचक्रोशीत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गणेशोत्सवात भक्तांना बाहेर पडणेही कठीण आहे. पाडलोस माडाचेगाळव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्ट्रीट लाईटचा एक खांब अचानक उन्मळून पडला. ग्रामस्थांनी याची खबर तात्काळ वायरमन उमेश कोरगावकर यांना दिल्यावर वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून खांब पूर्ववत उभा केला.

You cannot copy content of this page