गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संदीप गावडे व दिनेश गावडे अखेर एकत्र…

ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ यांचे निमित्त; चौकुल मध्ये रंगली एकच चर्चा

⚡आंबोली ता.२२-:
राजकीयदृष्ट्या एरवी विरोधात असलेले शिंदे गटाचे दिनेश गावडे यांच्यासह भाजपाचे संदीप गावडे गणेश चतुर्थी निमित्त चौकुळ येथे कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी दरम्यान एकत्र आल्याचे या सर्वाला निमित्त ठरले ते ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ. चौकुळ मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन घेत असतांना हे तिघे राजकीय नेते एकत्र आले यातून तिघांनीही एकमेकांसोबत हस्तांदोलन केले.

मुळात संदीप गावडे आणि दिनेश गावडे हे गेले कित्येक वर्ष एकमेकांसोबत बोलत नसताना रुपेश राऊळ यांच्या निमित्ताने ते एकत्र आले त्यामुळे याची चर्चा चौकुल गावात जोरदार रंगली आहे

You cannot copy content of this page