आदित्य ठाकरेंनी भर पावसात सावंतवाडी शहरातील गणरायाचे घेतले दर्शन…

रुपेश राऊळ; विक्रांत सावंत यांच्या गणरायाचे घेतले दर्शन: सार्वजनिक मंडळाला देखील दिली भेट

सावंतवाडी ता.२२-: गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर सिधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सावंतवाडीत भर पावसात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेटी देत गणरांयाचे दर्शन घेतले.

यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत ,यांच्यासह श्री ठाकरे शहरातील चितारआळी, सालईवाडा गणेशोत्सव मंडळ, भट्टीवाडी युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणराय लीन झाले.

दरम्यान आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एक दिवसाचा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानाला भेट देत दर्शन घेतले दरम्यान सावंतवाडी येथील त्यांनी भेट दिली परंतु त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तसेच भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा सावंतवाडी अध्यक्ष स्वप्निल बागकर, उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला सचिव शैलेश वेंगुर्लेकर सहसचिव मंथन जाधव खजिनदार घनश्याम जाबरे सदस्य ओम देऊळकर एडवोकेट आनंद मडगावकर अरविंद परब हिदायत खान आशिष कुलकर्णी महेश बिद्रे गणेश कुडव गणेश वेंगुर्लेकर शंकर तारी रुद्र वेंगुर्लेकर मुन्ना शेख,शैलेश वेंगुर्लेकर, आदी यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page