कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटक स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे यश

⚡कणकवली ता.२०-: नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाटक वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे या प्रशालेत संपन्न झाल्या.
या स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळाला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यामध्ये प्रत्युष पाताडे, वैदही पाताडे, सानिका खराटे, गौरेश शिंदे, भार्गवी खानविलकर, दीपक कानडे, अश्मेष लवेकर व रिया सावंत आदींचा नाटीका सादरीकरणात सहभाग होता.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयचे ज्येष्ठ शिक्षक शामसुंदर राणे तसेच विज्ञान विभाग प्रमुख सौ. सविता जाधव,सहाय्यक शिक्षिका सौ.पेडणेकर, मराठी विभागाचे प्रा.रामचंद्र राऊळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयचे प्राचार्य एम.डी. खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page