सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम….

गड किल्ला संवर्धनाच्या व्रताचे जिल्हाभरातून कौतुक

*💫सावंतवाडी दि.०८सहदेव राऊळ-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्गसेवक आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे जे व्रत हाती घेतले आहे, त्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. यात तटावरील झाडी साफ करण्यात आली. तटबंदीचे दगड उचलून ठेवण्यात आले. तसेच येथील शिवकालीन विहिरीतील गाळ काढण्यात आला. या किल्ल्याची स्वच्छता करतेवेळी जमा झालेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या दुर्गसेवक आणि शिवप्रेमी यांचे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले बांधले, राखले त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्यासाठी जनतेने हे कार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page